डोंबिवली ( शंकर जाधव ) : दरवर्षी कोकणवासीय गणपतीच्या सणानिमित्त गावी जातात दरवर्षी कोकणात जाण्यासाठी शासनाच्या वतीने मोफत पास देण्यात येतो १९ तारखेला गणपतीचे आगमन होणार आहे. चार दिवस सणाची तयारी करण्यासाठी कोकणवासीय कोकणात जातात. त्यामुळे कोकणवासीयांसाठी पास बिना विलंब देण्यास सुरुवात करावी अशी मागणी पत्र भाजपा पदाधिकारी नंदू परब, सूर्यकांत माळकर, दत्ता माळेकर, किशोर यादव आणि मनीषा राणे यांनी डोंबिवली वाहतूक नियंत्रण उपशाखेला दिले आहे.
Tags
महाराष्ट्र
