राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसी ( IRCTC) आणि एसटी महामंडळ (MSRTC) यांच्यात झालेल्या नव्या करारामुळे आता आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून आता एसटी महामंडळाच्या बसचे तिकीट आरक्षित करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ऑनलाईन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एसटीच्या प्ररवासी संख्येमध्ये वाढ होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी याकरिता एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी ) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या. आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची व्यवस्था एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने होणार आहे. या एकत्रीकरणामुळे प्रवाशांना सुरळीत प्रवासाची निश्चिंती मिळेल, असे आयआरसीटीसीच्या सीएमडी सीमा कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ऑगस्ट महिन्यात आयआरसीटीसी आणि एसटी महामंडळ यांच्या करार झाला. आयआरसीटीच्या वापरकर्त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. या करारामुळे रेल्वे, बस, हवाई, जल वाहतूक यासोबत निवास व्यवस्थेसारख्या सर्व पैलूंचे नियोजन करण्यात यश येईल. लवकरच प्रवाशांना आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाईट https://www.bus.irctc.co.in वरून रेल्वेसह एसटीबसचेही तिकीट बूक करता येणार आहे.
रेल्वेतून प्रवास करणारे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तिकीट आरक्षित करतात. आयआरसीटी आणि एसटी महामंडळ यांच्यात एकत्रीकरणामुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी रेल्वे आणि एसटी बसचे तिकीट आरक्षित करता येणार आहे.
.jpeg)