वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

  

 दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

डोंबिवली ( शंकर जाधव ) : थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवार १३ तारखेला सायंकाळी डोंबिवली पश्चिमेतील खंडोबा मंदिर परिसरात घटना घडली.

   मिळालेल्या माहितीनुसार, तेजस शिर्के आणि शुभम शिर्के गुन्हा दाखल झालेल्यांची आहेत. वीजपुरवठा वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल दुड्डे यांच्या फिर्यादीवरून तेजस व शुभम शिर्के यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाण अशा भारतीय दंड विधानाच्या विविध सहा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारंवार सूचना देऊनही वीजबिल न भरणाऱ्या पी. एस. देसाई या ग्राहकाचा वीजपुरवठा वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल दुड्डे व सहकारी आकाश गायकवाड यांनी खंडित करून मीटर काढले. यावर देसाईंच्या घरात राहणाऱ्या व वीज ग्राहक

तेजस व शुभम शिर्के यानी वरिष्ठ तंत्रज्ञ दुड्डे आणि सहकारी गायकवाड यांना मारहाण व दमदाटी करत अडवून ठेवले. कर्मचाऱ्यांनी संपर्क करून ही माहिती सहायक अभियंत्यांना दिली. सहायक अभियंता ई. ए. शेख यांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्यांची सुटका केली. या प्रकरणी पुढील पोलीस उपनिरिक्षक अमोल आंधळे करत आहेत.महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण व दमदाटीच्या गुन्ह्यात जबर शिक्षेची तरतूद आहे. कर्तव्यावरील महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय न आणता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post