रोटरीच्या कार्यशाळेत १७५ मुलांनी साकारले पर्यावरणपूरक गणपती

 


दिवा, ( आरती मुळीक परब) : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देऊन पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी दिवा शहरातील एस.एम.जी. विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली. रोटरी क्‍लब ऑफ दिवा ठाणे तर्फे आयोजित इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा मुळारंभ या संस्थेच्या प्रियांका गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एस.एम.जी. विद्यामंदिर आणि महाविद्यालयात दोन बॅचमध्ये पार पडली. यावेळी ५, ६ व ७ वीचे एकूण १७५ विद्यार्थी उपस्थित होते. 

एस.एम.जी. विद्यामंदिर व रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ही कार्यशाळा आयोजित केली होती. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेच्या वतीने अध्यक्ष हर्षद भगत, गणेश टावरे, साईनाथ म्हात्रे, अंकुर मुंडे, वैष्णव पाटील, प्रतीक बेडेकर, विकास गुंजाळ उपस्थित होते. तर एस.एम.जी. विद्यामंदिरकडून अमिता गायकर उपस्थित होत्या. मुलांमध्ये छंद जोपासण्याबरोबर त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहनदेण्यासाठी एस.एम.जी. विद्यामंदिर विविध उपक्रम राबवतअसते. 

मुलांचे लक्ष मोबाईलमधून काढून त्यांच्या हातातून नवीन कलाकृती घडावी, यासाठी पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती रोटरीचे दिवा ठाणेचे अध्यक्ष हर्षद भगत यांनी दिली. या कार्यशाळेत पर्यावरणपूरक साहित्य, सर्जनशीलता आणि टिकाऊपणा यावर भर देण्यात आला. त्यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना आपले हिंदू सण जबाबदारीने साजरे करण्याबद्दल शिक्षित केले गेले.



Post a Comment

Previous Post Next Post