धोकादायक इमारतीसाठी क्लस्टर व्यतिरिक्त आणखी काहीतरी योजना आणावी..



मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांची सूचना 

डोंबिवली ( शंकर जाधव ) :    न्यू आयरे गावात आदिनारायण भुवन या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून दोघांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आली. घटनास्थळी मनसे आमदार प्रमोद ( राजू पाटील ) यांनी भेट घेतली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले, एखाद्या बिल्डरच्या माध्यमातून सोयी सुविधा देऊन नागरिकांना कशी घर मिळतील याचा विचार करावा.

कल्याण आणि डोंबिवली शहरातील अशा जून्या धोकादायक इमारतीसाठी क्लस्टर व्यतिरिक्त आणखी काहीतरी योजना आणावी, उल्हासनगरला ज्याप्रमाणे राज्य सरकारने पॉलिसी आणली तशाच प्रकारची पॉलिसी याही शहरातील इमारतींसाठी वापरली जावी.


Post a Comment

Previous Post Next Post