माझा बाप्पा किती गोड दिसतो

 स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारला गणपती 

डोंबिवली ( शंकर जाधव )  : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित,स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक बाप्पाची मूर्ती बनविली. शनिवार १६ सप्टेंबर  रोजी गणेशोत्सव सुट्टीला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने सेंद्रिय माती,शाडूची माती,परिसरात उपलब्ध असलेली माती व चिकण मातीमधून साकारला त्यांच्या मनातील गणपती बाप्पा. गणपती गणपती बाप्पा साकारण्यापूर्वी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिकाभावना प्रकाश राठोड यांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर वर गणपतीच्या मूर्ती बनविण्याचे विविध प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. 

शाळेचे सहकारी शिक्षक  पाटील, महाले व राऊत यांनी स्वतःही विद्यार्थ्यांना गणपती मुर्त्या बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या उपक्रमातून  विद्यार्थ्यांनी सुंदर सुबक व अनोख्या गणपती मुर्त्या साकारल्या. उत्कृष्ट मुर्त्या साकारणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेतून बाप्पाला आकार दिला. गणपती मुर्त्या तयार झाल्यानंतर सर्वांनी गणपतीचे गाणे म्हणून नाचत जल्लोषामध्ये आपला उत्साह प्रकट केला. या उपक्रमाला शाळा समिती अध्यक्ष  माधवी कुलकर्णी, शाळा समिती सदस्य माधुरी जोशी, बापट व  मीनल जोशी यांनी खूप शुभेच्छा दिल्या व बालगोपाळांचे कौतुक केले.



Post a Comment

Previous Post Next Post