कै. प्रकाश ( नाना ) पेणकर यांना रिक्षाचालकांकडून श्रध्दांजली

 


डोंबिवली ( शंकर जाधव )  :  कै.प्रकाश ( नाना ) पेणकार यांच्या द्वितीय पुण्यतिथीला डोंबिवलीतील रीक्षाचालक -मालक युनियनच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. डोंबिवली पश्चिमेला स्टेशनजवळ युनियनचे पदाधिकारी अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, भिकाजी झाडे, राजा चव्हाण, बंड्या मोरोजकर, दिगंबर लिंगायत, प्रवीण मोरे, ईश्वर कनोजिया, रिक्षा चालकांचे नेते व रिक्षाचालकांनी श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी शेखर जोशी म्हणाले, रिक्षाचालकांचे आधार दैवत प्रकाश ( नाना ) पेणकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांना डोंबिवलीतील रिक्षाचालकांनी श्रद्धांजली वाहिली. नानांना रिक्षाचालक कधीही विसरू शकत नाही. नानांनी रिक्षाचालकांना जे मार्गदर्शन केले होते, त्यावर रिक्षाचालक नेहमीच चालत राहतील. यांच्या मार्गावर आम्ही चाललो, तर ती त्यांना खरी श्रद्धांजली असे ते म्हणाले.



Post a Comment

Previous Post Next Post