राहुल पाटील यांचा आमरण उपोषणाचा इशारा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला का अटक होत नाही ? तो खुलेआम फिरत असून पोलीस त्याच्यावर कारवाई का करत नाही असा आरोप राहुल पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला. पाटील यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तशी तक्रार केली होती. पोलीस आरोपीला पाठीशी घालत असून गुरुवारी १४ सप्टेंबर रोजी पोलीस उपायुक्त (D.C.P. Office) कार्यालय झोन ४ यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
गंभीर गुन्ह्यातील अद्याप काही आरोपींना अटक करणे बाकी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कुणाल दीनकर पाटील, अनिल दीनकर पाटील, मयुर दीनकर पाटील हे असून सदर आरोपी हे माझ्या राहत्या परिसरात मला उद्देशून व माझ्या कुटुंबाला उद्देशून दमदाटी तसेच जीवे मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे मला व माझ्या कुंटुंबाला त्यांच्यापासून जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी त्यांना तात्काळ अटक व्हावी म्हणून १४ सप्टेंबरपासून पोलीस उपायुक्त कार्यालय झोन ४ यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे पत्र राहुल पंडीत पाटील यांनी दिले आहे.
Tags
महाराष्ट्र
