- २५० उड्डाणे रद्द करण्यात येणार
- धावपट्टीच्या डागडुजीचे काम हाती
मुंबई : देशातील सर्वात व्यस्त असलेल्या आणि मोठ्या असलेल्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पुढील महिन्यात १७ ऑक्टोबर रोजी दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे तब्बल २५० उड्डाणे रद्द करण्यात येणार आहे. तर काही विमानांच्या वेळामध्ये बदल केला जाणार आहे. या कामांमुळे विमान व्यवसायावर तसेच देशाला आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.
मुंबई विमानतळ देशातील सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून ओळखले जाते. दिवसाला तब्बल ९०० हून अधिक उड्डाणे येथून होतात. त्यामुळे हे विमानतळ महत्वाचे मानले जाते. मुंबईच्या विमानतळाला दोन धावपट्ट्या आहेत. त्या मेकमेकांना छेदत असल्यामुळे एका वेळी एकच धावपट्टी वापराता येते. सर्वाधिक वापर हा घाटकोपर-अंधेरी धावपट्टीचा होतो. या दोन धावपट्ट्या विमानतळाला जेथे छेदतात, तेथे विमान खाली उतरत असताना पहिल्यांदा जमिनीला स्पर्श करत असल्याने हा भाग सर्वाधिक खराब होतो. पावसामुळे तर हा भाग आणखीन खराब होतो. त्यामुळे या भागाची दुरुस्ती ही प्रधान्यांने केली जाते.
पावसाळ्यात विमानतळावरून उड्डाणे सुव्यवस्थित होतील, असे नियोजन केले जाते. त्यादृष्टीने १८ ऑक्टोबर २०२२ रोजी ही डागडुजी करण्यात आली. त्यानंतर यावर्षी २ मे रोजीही अशी दुरुस्ती करण्यात आली. आता पुन्हा धावपट्टीच्या डागडुजीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. १७ ऑक्टोबरला ही दुरुस्ती केली जाणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान डागडुजी आणि दुरुस्तीसाठी ही धावपट्टी बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे जर १७ आणि १८ ऑक्टोबरला जर तुम्ही मुंबईहून विमान प्रवास करतांना प्रवाशांनी उड्डाणाच्या वेळा तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.