लोकसभेच्या ११ जागांसाठी मनसेची चाचपणी सुरू

 


मनसे आमदार राजू पाटील यांची माहिती

डोंबिवली/ शंकर जाधव : आम्ही इंडियात नाही, राज ठाकरे यांनी ११ लोकसभा संघटना बांधण्यासाठी दिल्या आहेत, त्यामध्ये कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभामध्ये संघटक म्हणून माझी नियुक्ती केली. येत्या आठवड्यात याबाबत बैठक सुरू होणार आहेत. लोकसभेच्या ११ जागांसाठी मनसेची चाचपणी करत या बैठकाचा आढावा राज ठाकरें समोर मांडणार आहोत असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. 

 मनसेने मुंबई महामार्गावर कोकण जागर यात्रा काढल्यानंतर आता कल्याण ग्रामीण जागर यात्रा अशी पोस्ट व्हायरल भाजप पदाधिकाऱ्यांनी व्हायरल केली आहे. हा मतदार संघ हा मनसे आमदार राजू पाटील यांचा मतदारसंघ असल्याने भाजपने मनसेला लक्ष केलं आहे. याबाबत बोलताना आमदार राजू पाटील यांनी त्यांनी जागर यात्रा काढावी गाजर यात्रा काढू नका असा टोला भाजपाला लगावलाय. पुढे बोलताना आमदार पाटील यांनी त्यांनी जागर यात्रा काढावी, मी तिथला लोकप्रतिनिधी आहे, माझ्या काही चुका असतील त्यांनी मला दाखवाव्यात. त्यांनी जागर यात्रा काढली तर मी त्यांना अतिरेकी म्हणणार नाही. त्यांच्या समस्या समजून घेऊ आणि त्यातून मार्ग काढू. चार वर्ष बर्मुडा घालून बसायचं निवडणुका आल्या की बाहेर पडायचं असे काही जणांचे कार्यपद्धती असते. त्याप्रमाणे हे चाललंय असा टोला भाजप पदाधिकाऱ्यांना लगावाला आहे.

 अनेक डॉक्टर प्रशासनात आहेत, राजकारणात आहेत मात्र कल्याण  डोंबिवलीच्या लोकांच्या समस्याची नस अजून सापडली नाही हे दुर्दैव असल्याचा टोला मनसे आमदार राजू पाटील यांचा अप्रत्यक्षरित्या खासदार श्रीकांत शिंदे यांना लगावला.

 भर रस्त्यात मृतदेह स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडीओ कल्याणमध्ये व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर कल्याण डोंबिवली मधील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याबाबत बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी मृतदेहावर बोलून राजकारण करणे मला संयुक्तीक वाटत नाही. ती यात्रा होती ती मृत पावलेल्या प्रशासनाचे प्रतिक होते. अशा गोष्टीवर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही. मी सुद्धा कोविड काळात एक रुग्णवाहिका दिली हाेती. रस्त्यावर दिसत नाही. परिस्थिती काय आहे ते पहा. प्रशासन पण हलगर्जीपणा करते. आरोग्याच्या बाबतीत सगळा सावळा गाेंधळ आहे. अनेक डॉकटर प्रशासन आणि राजकारण आहेत. त्यांना लोकांच्या समस्यांची नस सापडलेलीच नाही अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी नाव घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केली आहे. 

मुंबई  कोविड मधील घोटाळे काढले जातात कल्याण डोंबिवली ठाणे परिसरातील घोटाळे का काढले जात नाहीत  असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला. रुग्णालयातील डॉक्टर भरती ही कंत्राटदारी पद्धतीने केली जाते या प्रश्नावर आमदार राजू पाटील यांनी कंत्राटामध्ये जास्त पैसे कमाविता येतात. म्हणून ते कंत्राटच देतात. कोविड काळात जी कंत्राटे आली. आज मुंबईतील कोविड घाेटाळे काढले जातात. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीचे का काढले जात नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.






Post a Comment

Previous Post Next Post