डोंबिवली ( शंकर जाधव ): सुधाश्री या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थेतर्फे तृतीयपंथी यांचे सोबत रक्षाबंधन सोहळा संपन्न झाला.समाजातील एक दुर्लक्षित घटक आणि आज ही समाज त्यांना आपल्यात सामावून घेत नाही ही दुर्दैवी शोकांतिका आहे.ते ही आपल्या समाजातील एक भाग आहे याची जाणीव करून देण्यासाठी सुधाश्रीने हा उपक्रम हाती घेतला होता.
यावेळी आलेल्या प्रत्येक तृतीयपंथी यांना पारंपरिक पद्धतीने दारात औक्षण करून मानाने आत आणण्यात आले.सौभाग्य वाण मोगऱ्याचा गजरा देण्यात आला.त्या नंतर दिप प्रजवलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुधाश्री संस्थेचे करंदीकर आणि परुळेकर यांनी तसेच तृतीय पंथीय इला जाधव महाडिक,श्रेया टाक तपस्या राठोड यांनी मिळून दिप प्रज्वलन केले.त्यानंतर या कार्यक्रमाची प्रस्तावना सुधाश्री अध्यक्षा ॲड माधुरी जोशी यांनी मांडली.त्यानंतर राखी बांधण्याचा कार्यक्रम झाला.तृतीय पंथीयांनी सुधाश्रीचे पुरुष कार्यकर्त्यांना राखी बांधली व त्यांना ओवाळणी देण्यात आली.त्यानंतर तृतीयपंथीला जाधव महाडिक, श्रेया टाक तपस्या राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
समाज आज ही आम्हाला स्वीकारत नाही. भीक नको काम हवे आहे ते मिळत नाही इज्जत मिळत नाही. समाजाची सेवा करायची आहे पण करता येत नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली.या लोकांना काम,समाजात स्थान मिळवून देण्यासाठी सुधाश्री बांधील आहे.आम्ही नक्की या विषयावर काम करू तुम्हाला आमचे सोबत घेवून जावू,समाजात स्थान तसेच नोकरी व्यवसाय मिळवून देण्यात प्रयत्न करू असे आश्वासन यावेळी सुधाश्रीच्या अध्यक्षा माधुरी जोशी यांनी दिले.यावेळी सुधाश्री चे पदाधिकारी, अनिल करंदीकर,सुभाष परुळेकर,आश्विन देशमुख,अभिजित पवार,अजिंक्य जोशी,उषा बोरसे, अश्विनी मुजुमदार व कार्यकर्ते हजर होते तसेच सात तृतीय पंथी या कार्यक्रमाला आले होते.