डोंबिवली ( शंकर जाधव ) : माझ्या वाढदिवसानिमित्त शहरात कुठेही बॅनर लावून शहराचा विद्रूपीकरण करू नका त्याऐवजी रस्त्यावरील एक खड्डा बुजवा असे आवाहन कार्यकर्त्यांना मनसे पाटील यांच्याकडून करण्यात आले होते. २६ सप्टेंबर मनसे आमदार राजू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली ग्रामीण व कल्याण ग्रामीण भागात मनसैनिकांनी रस्त्यातील खड्डे बुजवले.मनसे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, उपविभाग अध्यक्ष सचिन माने व शाखा अध्यक्ष योगेश माने यांनी डोंबिवली ग्रामीण भागातील रस्त्यातील खड्डे बुजविले तर कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचे पदाधिकारी योगेश पाटील यांसह मनसैनिकांनी हा उपक्रम राबविला.
या संदर्भात संजय चव्हाण म्हणाले, मनसे आमदार पाटील यांनी वेळोवेळी केलेल्या सूचना अंमलात आणण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने त्यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे बॅनर लावून शहराच विद्रूपीकरण न करता काहीतरी समाज उपयोगी काम झाली पाहिजे. तसेच लोकांचे आशिर्वाद मिळावेत या एकाच उद्देशाने निवासी विभागातील खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. त्यातील काही रस्ते बुजविले. करण्यात आली.
कल्याण ग्रामीण मध्ये मनसेचे पदाधिकारी योगेश पाटील यांच्या वतीने शहरातील खड्डे बुजवण्यात आले. केडीएमसी आयुक्त यांचे नाव दगडावर लिहून त्या खड्ड्यामध्ये हे दगड टाकण्यात आले होते. आताचे आंदोलन हे शांततेने करण्यात आले असून यापुढे मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी मनसे पदाधिकारी योगेश पाटील दिला.