Alibag news : वीज पडून बाप-लेकाचा मृत्यू

 


 अलिबाग तालुक्यातील दिवलांग मधील घटना

अलिबाग : अलिबाग तालुक्यात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. तालुक्यातील पेझारी नजीकच्या दिवलांग येथील रघुनाथ हिराजी म्हात्रे (५६) व त्‍यांचा मुलगा ऋषीकेश रघुनाथ म्हात्रे या बाप-लेकाचा वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी  घडली.दरम्यान, तहसीलदार विक्रम पाटील यांनी मयत रघुनाथ म्हात्रे व मुलगा ऋषीकेश म्हात्रे यांच्या घरी भेट देऊन त्यांची पत्नी व मुलगा यांचे सांत्वन केले.

अलिबाग तालुक्यात शनिवारी रात्री विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. अशातच वडील रघुनाथ म्हात्रे व मुलगा ऋषीकेश हे दोघेही बाप-लेक संध्याकाळच्या वेळेस गावाजवळ असलेल्या मत्स्यतलावात खाद्य टाकण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली आहे. मुसळधार पाऊस असतानाच दोघांच्या अंगावर वीज पडली होती.  यावेळी त्‍यांच्यावर वीज पडली व त्यांचा जागीच मृत्‍यू झाला. त्या दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. 

Post a Comment

Previous Post Next Post