१६ वयाखालील १०० व ३०० मी धावण्याच्या स्पर्धेत राज्यात अव्वल
डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र शासनातर्फे राज्यस्तरीय डेरवण येथे ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर २०२३ रोजी पार पडली. दिवा शहरातील अथर्व अजय भोईर याने १६ वयाखालील मुलांच्या १०० मी व ३०० मी या दोन्ही धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून आपल्या ठाणे जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. अथर्व याची अपार मेहनत, जिद्द , चिकाटी आणि त्याला जोड असणारी त्याच्या आईवडिलांची प्रचंड साथ,प्रोत्साहनआणि त्यांचा गणपती बाप्पावरील दृढ विश्वास यामुळेच हे यश प्राप्त झालं आहे .अथर्व याने आतापर्यंत त्याची विजयी घोडदौड विविध स्पर्धेतून कायम ठेवलेली आहे. अथर्व नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
Tags
क्रीडा