डोंबिवली ( शंकर जाध ) : डोंबिवली कल्याण शहराला जोडणारा ठाकुर्लीतील चोळे गावातून नव्वद फुटी रस्त्याकडे जाणारा रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे गरजेचे असताना पालिका प्रशासनाने या रस्त्याचा काही भागावर पेव्हर ब्लॉक बसविले. काम सुरू असल्याने रस्ता बंद केल्याने डोंबिवलीकडून कल्याणला जाणाऱ्या व कल्याण हून डोंबिवली शहरात येणाऱ्या वाहन चालकांना ठाकुर्ली हून वळसा घालून शेलार नाका येथे आपली वाहने वळून आणावी लागतात. या रस्त्याला पेव्हर ब्लॉक ची मात्रा लावली जात असली ही पेव्हर ब्लॉक ची मात्रा कायम स्वरुपी उपाय नसल्याने या रस्त्याला सिमेंट काँक्रीटीकरणाशिवाय पर्याय नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पालिकेने या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी पालिकेने प्रस्ताव तयार केला आहे. पालिका प्रशासनाने शासनाकडे पालिका क्षेत्रातील रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणासाठी १३२० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावाची मागणी केली आहे. या निधीतून सदरच्या रस्त्याचे सिमेटि काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. मात्र शासनाचा निधी मंजूर झाल्यावरच हे शक्य आहे. दरवर्षी रस्त्याची डागडुजी देखभाल दुरुस्ती तसेच डांबरीकरण करण्यासाठी तरतूद केलेल्या निधीतून कामे करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराच्या कडून सध्यास्थितीला ठाकुर्लीतील या महत्त्वाच्या रस्त्यातील जुने हनुमान मंदीर, चोळेगाव, ठाकुर्ली ते बँक ऑफ महाराष्ट्र, कै. रामभाउ चौधरी चौक, ठाकुर्ली दरम्यानच्या २०० मिटर रस्त्यावर पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम सुरू करण्यात आले असून पेव्हर ब्लॉक लावण्याच्या काम पंधरा दिवस लागणार आहे. सदरचा रस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावरून वाहनाची वाहतूक करणे शक्य होणार नसल्याने सदरचा रस्ता ठाकुर्ली महाराष्ट्र ते जुने हनुमान मंदिर चोळे दरम्यानचा रस्ता बंद करण्यात आला आहे.त्यामुळे डोंबिवली पश्चिमेहून ठाकुर्ली ब्रीज हून सा. वा .जोशी हायस्कूल कडून शेलार नाका मार्ग घरडा सर्कल कडून कल्याणला जाण्याची व कल्याण हून याच मार्गाने डोंबिवलीला वळसा घालून येण्याची तारेवरची कसरत करावी लागत आहे.