गांधी जयंतीनिमित्त दिव्यात राबवले स्वच्छता अभियान

 


दिवा ( आरती मुळीक परब) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहना प्रमाणे स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास" दिवा शहरातील दिवा चौक व दिवा स्थानक पूर्व येथे स्वच्छता अभियानात दिवा प्रभात समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे तसेच दिवा पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके स्वतः आपल्या सहकारी व कर्मचाऱ्यांसह उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्याच्या मुख्यमंत्र्याच्या आवाहनास प्रतिसाद देत शिवसेनेचे उपशहर प्रमुख व नगरसेवक शैलेश पाटील, नगरसेवक अमर पाटील यांच्यासह शाखाप्रमुख चंद्रसेन यादव, रवींद्र परब, पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलीस मित्र या अभियानात सहभागी झाले होते. “स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात “एक तारीख एक तास" या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ - सफाई अभियान राबविण्यात आले.



Post a Comment

Previous Post Next Post