मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात आगामी काळात अराजकता वाढेल तसेच देशात दंगली घडवल्या जाऊ शकतात असेही काही दिवसांपूर्वी म्हटले होते, त्यावर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आंबेडकरांना ही माहिती कशी मिळाली? त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली पाहिजे, असे राणे म्हणाले होते. राणेंच्या या टीकेचा प्रकाश आंबेडकर यांनी समाचार घेत चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
गेल्या ७० वर्षात अनेक वेळा सत्तापालट झाला. हा सत्तापालट शांततेने पार पडला. यावेळी सत्ता पालट होईल की नाही हे निवडणुक निकालात स्पष्ट होईल. पण निकालाआधी दंगलीचे, अराजकतचे वातावरण असेल. देशात अराजकता माजवली जाऊ शकते. त्यासाठी प्लॅनिंगही सुरू असल्याचे सांगत माझे सर्व भारतीयांना आव्हान आहे. डोकं भडकण्याची काम होणार असल्यामुळे सावध रहा. गणपती विसर्जनाच्या दिवशी ईद साजरी करणार नाही, असे मुस्लिमांनी ज्या पद्धतीने सांगून दुसऱ्या दिवशी ईद साजरी करण्याचा जो काही निर्णय घेतला ते सामंजस्य वाखाणण्यासारखे आहे. तुम्हीही तेच सामंजस्य दाखवा असे सांगितले.
प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर नारायण राणे यांनी पोलिसांनी प्रकाश आंबेडकरांना ताब्यात घ्यावे. त्यांची वक्तव्ये भयानक असल्याचे राणे यांनी म्हटले. तसेच हल्ला होणार आहे, मग त्याची माहिती प्रकाश आंबेडकरांना कुठल्या मार्गाने मिळाली? हे सगळे भयानक आहे. मुळात भाजप ही राष्ट्राभिमानी पार्टी आहे. भाजपची केंद्रात गेल्या १० वर्षांपासून सत्ता आहे. देशात १० वर्षांपासून एकच पंतप्रधान आहे. त्यामुळे अशा अफवा पसरवणाऱ्यांची पोलिसांनी दखल घ्यावी अशी मागणी केली होती.
नारायण राणेंच्या वक्तव्यावर , त्या चिंधी चोराने माझ्याशी वाद घालू नये. मी एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी आपल्या देशातील अनेक अधिकारी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचे जनक मानतात. तेच अधिकारी मला ही माहिती देत असल्याचे सांगत देशात अशी कुठलीही घटना घडू नये ही त्यांची अपेक्षा असते, म्हणूनच ते मला याची माहिती देतात असे म्हटले.