रोटरीकडून दिवा पोलिसांना वॉटर प्युरिफायरची भेट

 

दिवा, (आरती मुळीक परब) :  दिव्यातील मुंब्रा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस चौकीला रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या कडून वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आला. त्यावेळी तो वॉटर प्युरीफाय दिवा चौकीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शहाजी शेळके यांच्या कडे रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या टिमने सुपूर्द केला. पोलीसांनी ही कामाच्या ठिकाणी स्वच्छ पाणी प्यावे, यासाठी तो देण्यात आला आहे. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेच्या वतीने अध्यक्ष हर्षद भगत, स्वप्नील गायकर, अभिषेक ठाकूर, साईनाथ म्हात्रे, किशोर पाटील, प्रतीक बेडेकर, युवराज बेडेकर, विकास गुंजाळ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post