दिव्यातील विठ्ठल रुक्मीनी सहकारी पतपेढीचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा

दिवा, (आरती मुळीक परब) : विठ्ठल रुक्मीनी सहकारी पतपेढी लि. या संस्थेच्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, सातारा या पाच जिल्ह्यां मध्ये लोअर परेल (मुंबई), वाशी, कल्याण, दिवा, उल्हासनगर, आंबिवली, नालासोपारा, वाई अशा आठ शाखा आहेत. आज दिवा शाखेचा सातवा वर्धापन दिन साजरा झाला. त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गेनबा जगन्नाथ मांढरे, संचालक प्रकाश पाटील, संस्थेचे कार्यकर्ते शंकर काका पाटील व इतर मान्यवर सभासद, संस्थेचे अधिकारी कर्मचारी व दैनंदिन ठेव प्रतिनिधी यांच्या समवेत दिप प्रज्वलन करुन केक कापून हा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.

 या संस्थेचे वार्षिक आर्थिक खेळते भांडवल ५५ कोटींच्यावर असून संस्थेत १२ हजार ८३१ सभासद आहेत. या विठ्ठल रुक्मीनी संस्थेच्या माध्यमातून दिवा शाखे मार्फत महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी २०० ते २५० बचत गट बनवले गेले आहेत. या गटांना पतपेढी मार्फत कर्ज पुरवठा केला जातो.



Post a Comment

Previous Post Next Post