पंजाबमध्ये १०० गाड्या एकमेकांवर आदळल्या

पंजाब: अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर दाट धुक्यामुळे  जवळपास १३ किलोमीटर परिसरात १०० हून अनेक वाहने एकमेकांना धडकल्याची घटना घडली. पंजाबच्या लुधियाणामधील खन्ना येथे हा अपघात घडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून जखमींचा आकडा १२ वर पोहचला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त वाहनांमध्ये पंजाब रोडवेजच्या एका बसचाही समावेश आहेत. या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अमृतसर- दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पहाटेच्यावेळी रस्त्याने जात असताना दाट धुक्यामुळे दोन वाहने सुरुवातीला एकमेकांवर आदळली. त्यानंतर मागून येणाऱ्या वाहनांना देखील धुक्यामुळे काही दिसत नसल्याने त्यांची समोरील वाहनांना जोरदार धडक बसली. सलग १०० वाहने अशा प्रकारे एकमेकांवर आदळली.

या अपघातात चारचाकी, दुचाकीसह एका बसचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर वाहनांचा अपघात झाल्याने अमृतसर- दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर वाहतुककोंडीची समस्या निर्माण झाली होती. रस्त्यावर २५ ते ३० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post