उत्तरकाशी : ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील सिल्कियारा ते दंडलगाव दरम्यान तयार करण्यात येणाऱ्या बोगद्याचा काही भाग रविवारी सकाळी कोसळल्याने ४० कामगार अडकले होते. त्यांना वाचविण्याचे प्रयत्न मंगळवारी देखील सुरू होते. मंगळवारी तिसऱ्या दिवशी अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके आता बोगद्याच्या आत ९०० मिमी पाईप बसवून रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बोगद्याची एकूण लांबी ४.५ किमी असून, सिल्कियराच्या टोकापासून २,३४० मीटर आणि दंडलगावच्या बाजूने १,७५० मीटर बांधण्यात आले आहेत. बोगद्याच्या दोन्ही बाजूंमधील ४४१ मीटरचा पट्टा अद्याप बांधायचा आहे. हे काम सुरू असताना सिल्कियराच्या बाजूने पडझड झाली, आणि त्यात ४० कामगार अडकून पडले. हा भाग प्रवेशद्वारापासून २०० मीटर अंतरावर होता. अडकलेल्या कामगारांना अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यासाठी मशीनचा वापर केला जात आहे.
आतमधील काँक्रीटचे ढिगारे, चिखल आणि भंगार साफ करण्यासाठी दोन आरओसी मशिनसह जड एक्साव्हेटर्स वापरत केला जात आहेत. उत्तरकाशीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्पण यदुवंशी यांनी सोमवारी सांगितले की, ६० मीटरच्या ढिगाऱ्यापैकी २० मीटरहून अधिक कचरा साफ करण्यात आला आहे. “मंगळवार संध्याकाळपर्यंत आत अडकलेल्या ४० लोकांना बाहेर काढण्याची आम्हाला अपेक्षा आहे,” असे त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले.
मंगळवारी बचावकार्य पोहोचले असून ढिगाऱ्यातून पाईप ढकलण्यासाठी आणि कामगारांना बाहेर काढण्यासाठी ऑगूर मशीनसाठी आडव्या दिशेने ड्रिल करण्यासाठी व्यासपीठ तयार केले जात आहे. ९०० मि.मी.चे पाईप कामगारांना जाण्यासाठी पुरेसे रुंद असतील. बचाव पथकांव्यतिरिक्त, ऑपरेशनसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रणा आणि उपकरणे घटनास्थळी आणण्यात आली आहेत. या कारवाईला गती देण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारीही सोमवारी रात्री बोगदा बचाव स्थळी दाखल झाले होते.
बचाव कार्यात गुंतलेले उत्तरकाशीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी बोगद्यातील सर्व कामगार सुरक्षित आहेत. काही कामगारांचे कुटुंबीय बोगद्याच्या ठिकाणी पोहोचले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मंगळवारी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) बचावकर्ते अडकलेल्या कामगारांशी रेडिओद्वारे संपर्क साधला असता बोगदा विभागात अडकलेल्या लोकांना "सुमारे पाच ते सहा दिवस" जगण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन असल्याची मााहिती रणजीत कुमार सिन्हा, वरिष्ठ आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी दिली.
.jpg)
.jpeg)