भारतात रंगणार महिलांचा कसोटी सामना

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात येणार 

मुंबई : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. डिसेंबर महिन्यात भारतीय महिला संघ पहिले इंग्लंडसोबत तीन टी२० आणि एक कसोटी सामना खेळणार आहेत. तर ऑस्ट्रेलियन संघ तीन एकदिवसीय आणि एक कसोटी सामना खेळणार आहेत. भारतीय संघ प्रथमच मायदेशात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सोबत खेळणार असल्याने याचा फायदा नक्कीच भारतीय महिला संघाला होणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही संघासोबत खेळताना मोठे आव्हान देखील असणार आहे. त्यावर भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने या आव्हानासाठी उपलब्ध वेळेत मानसिक तसेच शारीरिकदृष्ट्या तयार होण्यासाठी आम्हाला सज्ज राहावे लागेल, असे मत व्यक्त केले.

२०१४ नंतर प्रथमच मायदेशातच भारतीय महिला संघ कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. इंग्लंडचा संघ ३ टी-२० व एका कसोटी सामन्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ६, ९ व १० डिसेंबर रोजी उभय संघांत मुंबईतील वानखेडे मैदानावर टी-२० सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर १४ डिसेंबरपासून इंग्लंड सोबत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर कसोटी सामना खेळणार आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यांच्यातील एकमेव कसोटी २१ डिसेंबरपासून मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळवण्यात येईल. त्यानंतर २८, ३० डिसेंबर व २ जानेवारी रोजी उभय संघांत तीन एकदिवसीय सामनेही होतील. हे सामनेसुद्धा वानखेडे स्टेडियमवरच होणार आहेत. भारतीय संघ डिसेंबरमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येकी एक कसोटी खेळणार आहे. या आव्हानासाठी उपलब्ध वेळेत मानसिक तसेच शारीरिकदृष्ट्या तयार होण्यासाठी आम्हाला सज्ज राहावे लागेल, असे मत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने व्यक्त केले. दरम्यान, या दोन्ही कसोटी प्रत्येकी चार दिवसांच्या असतील.

हरमनप्रीतने कारकीर्दीत फक्त ३ कसोटी सामने खेळलेले आहेत. २०१४मध्ये आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या कसोटीचा हरमनप्रीत भाग होती. भारतीय महिलांनी २०१४ मध्ये मायदेशात अखेरची कसोटी खेळली आहे. तर गतवर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या येथे कसोटी सामना खेळलेला आहे. 




  

Post a Comment

Previous Post Next Post