डोंबिवली ( शंकर जाधव ) : कुस्तीगिरांचे गाव म्हणून हेदूटणे गावाची ओळख असून येथील कुस्तीपटूंसाठी लागणाऱ्या कुस्तीच्या मॅटचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील आणि महाराष्ट्र उप केसरी वैष्णवी पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. हेदूटणे गावचे माजी सरपंच तथा मनसे शहर संघटक तकदिर काळण यांनी स्वखर्चाने ही मॅट कुस्तीपटूंसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे म्हात्रे पाडा आणि भंडारी पाडा येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच योगिता काळण, वनिता काळण, नंदाबाई भंडारी, दिलीप पाटील, नारायण भंडारी, फुलचंद काळण, गणपत भंडारी, अनंता महाराज, गोवर्धन काळण, सुक-या पाटील, गणपत पाटील, एकनाथ संते, काशिनाथ काळण, श्रीपतबुवा काळण, शंखुनाथ पाटील, ऊमेश काळण, प्रकाश काळण, हरिचंद्र काळण, दिलीप पाटील, किशोर काळण, विजय संते, मच्छिंद्र पाटील, गणेश म्हात्रे, फिरदास काळण, अरूण म्हात्रे, रमेश भंडारी, बाबूराव संते, ऊदय म्हात्रे, अंकुश भंडारी, बाळाराम भंडारी, भगवान काळण, विश्वास पाटील, किशोर भंडारी, फकिरा काळण, भास्कर म्हात्रे, सखाराम पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र
