गीतिशा पार करणार एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया १२ किलोमीटर अंतर

डोंबिवली ( शंकर जाधव )  : डोंबिवलीतील धाडसी व साहसी जलतरणपटू गितीशा प्रवीण भंडारे ही इयता ४ थी मध्ये शिकत असून तिला अभ्यासाबरोबर जलतरणाची आवड आहे. गीतिशा हिने डोंबिवलीतील यश जिमखान्यात प्रशिक्षक विलास माने यांच्याकडे अडवान्स कोचिंग लावले. तिने राज्य स्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत मुंबई येथे 2 किलोमीटर मध्ये उत्तम कामगिरी केली. तिला आता १८ नोव्हेंबर रोजी एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया १२ किलोमीटर पोहायचे आहे.त्यासाठी ती यश जिमखाना मध्ये सराव करते. गीतिशा दररोज ३ ते ४ तास सराव करते. तिला यश जिमखाना मालक राजू वडनेरकर व स्टाफ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

Previous Post Next Post