- डोंबिवलीपासून रक्तदान शिबीर
- ८० रक्ताच्या बाटल्या जमा
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डेंग्यूचे आणि मलेरियाची साथ, अपघातग्रस्त रुग्ण, गरोदर स्त्रिया यांना रक्ताची आवश्यकता असून ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुडवडा जाणवत आहे.त्याकरता ठाणे सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने डोंबिवलीपासून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डोंबिवलीतील अनेक कंपन्यामधील कर्मचाऱ्यांची रक्तदान केले. डोंबिवलीतील कामा संघटनेच्या कार्यालयात या शिबिरात सुमारे ८० रक्ताच्या बाटल्या जमा झाल्या.
ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटल, ठाणे जिल्हा तसेच पालघर व रायगड येथून आदिवासी रुग्णांना, गरोदर स्त्रियांची प्रसूती व सिझेरियन सेक्शन हॉस्पिटल ठाणे येथे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अपघात ग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येते. ठाणे सिव्हिल हॉस्पिटल ठाणे येथे रक्ताची टंचाई जाणवत आहे व संपूर्ण मुंबई व ठाणे शहरात रक्ताचा तुटवडा आहे. युद्धपातळीवर तातडीने रक्तदान शिबीर आयोजित केले जात आहे. सुरक्षा आणि आरोग्य संचलनालय सहसंचालक सुरेश जोशी याची माहिती मिळाली. जोशी यांनी कामा संघटनेचे अध्यक्ष राजू बैलूर आणि पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून कामा संघटनेने याकामी सहकार्य करण्यास सांगितले.
कामा संघटनेचे अध्यक्ष बैलूर, कार्याध्यक्ष डॉ. देवेन सोनी, उपाध्यक्ष नारायण माने, सचिव अमोल योवले, उद्य वालावलकर, सेफ्टी कमिटीचे अध्यक्ष बापजी चौधरी यांनी या समाजकार्यात पुढकार घेत मंगळवारी डोंबिवलीतील कामा संघटनेच्या कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित केले होते.यावेळी ठाणे सिव्हील हॉस्पिटलमधील डॉ. गिरीश चौधरी यांसह अनेक डॉक्टर्स आणि कामा संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.
यावेळी डॉ.चौधरी म्हणाले, ठाणे सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या जास्त असून सध्यस्थितीत रक्ताचा तुटवडा असल्याने ठाणे जिल्ह्यात रक्तदान शिबीर भरविण्याचे ठरविले.या शिबिराची सुरुवात डोंबिवलीपासून झालिया असून पुढे अंबरनाथ आणि इतर शहरातही शिबीर भरविले जाणार आहेत.तर कामा संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. सोनी यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान असून कर्मचाऱ्यांनी रक्तदान केल्याचे सांगितले.
Tags
महाराष्ट्र

