डोंबिवली ( शंकर जाधव ) : नवनियुक्त डॉ.इंदुराणी जाखड या बुधवारी डोंबिवलीत रस्त्यांची पाहणी व स्टेशन परिसराची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे समजताच पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई केली.डोंबिवली पूर्वेकडील 'फ' प्रभाग क्षेत्र हद्दीतील स्टेशन बाहेरील परिसरात बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांना हटविण्यात आले.
सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप व अधीक्षक जयवंत चौधरी व पालिका कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांवर कडक कारवाई केली. फेरीवाल्यांचा माल जप्त करून पालिका कार्यालयात आणण्यात आला. माल जप्त करून नये म्हणून फेरीवाल्यांनी विरोध केला होता मात्र पालिका कर्मचाऱ्यांनी विरोधाला न जुमानता कारवाई सुरूच ठेवली.
दिवाळी सणात कारवाई नको अशी मागणी करत याच फेरीवाल्यांनी डोंबिवली रामनगर तिकीट घरासमोरील रस्त्यावर काही वेळ ठिय्या आंदोलन केले होते. आता पुन्हा दिवाळी यानंतर फेरीवाले बसत असल्याने पालिकेकडून जोरदार कारवाई करण्यात आली.
Tags
महाराष्ट्र
