गीतिशाची उत्कृष्ट कामगिरी
डोंबिवली ( शंकर जाधव ) : स्ट्रोक शिकवल्यावर राज्य स्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत मुंबई येथे प्रथम भाग घेऊन उत्तम कामगिरी करणाऱ्या गीतिशा प्रवीण भंडारे या ९ वर्षीय विद्यार्थिनीला समुद्राची आवड निर्माण झाली.एवढ्यावरच न थांबता गीतिशा लहान वयात समुद्रातील इव्हेंट करायचा निर्धार केला.१८ नोव्हेंबरला एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया १२ किलोमीटर पोहण्यासाठी सराव सुरू केला. गितिशा दररोज यश जिमखाना मध्ये ३ ते ४ तास प्रशिक्षक विलास माने व रवि नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होती.यश जिमखाना मालक राजू वडनेरकर व जिमखाना स्टाफ यांचे मार्गदर्शन मिळाले.
गीतिशाने महिन्यातून २ वेळा उरणला संतोष पाटील यांच्याकडे समुद्रात सराव केला होता करते. शनिवार १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजून ८मिनिटांनी अंगाला ग्रीस लावून समुद्राची पूजा करून अथांग पसरलेल्या अरबी समुद्रात उडी मारली. मध्येच गार वारा सुटलेला, मोठ मोठी जहाजे येत जात होती.त्याच्यामुळे लाटा निर्माण होत होत्या. मग तोंडात घाण व खराब खारट पाणी जायचे.समुद्रातील वाढते प्रदूषण, मध्येच गॉगल मध्ये माती लागलेली, ती साफ करून पोहणे चालूच ठेवले. गेटवे ऑफ इंडिया जवळ पाण्यावर तेलाचा तवंग पसरलेला, तेच पाणी तोंडात जायचे.मग उलटी सारखं वाटायचे. गितिशाने अखेर मेहनत व जिद्दीच्या जोरावर गेटवे ऑफ इंडिया येथे सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी पोहचली.
महाराष्ट्र राज्य हौसी जलतरण संघटनेचे निरीक्षक नीलकांत आखाडे यांनी ऑफिसियल टाईम ३ तास ४३ मिनिट सांगितले. गितिशा गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचल्यावर प्रशिक्षक विलास माने,संतोष ,आखाडे व उपस्थितांनी गीतिशाचे जोरदार स्वागत केले.गितिशा प्रवीण भंडारे ही डोंबिवलीत राहत असून रॉयल इंटरनॅशनल स्कूल मध्ये ४ थी मध्ये शिकते. गितिशा डोंबिवलीतील यश जिमखाना मध्ये स्विमिंग प्रशिक्षक विलास माने यांच्याकडे ॲडवान्स कोचिंग लावले.

