कुणबी आरक्षणाशी मराठ्यांचा संबंध नाही

 

सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका 

दिवा, (आरती मुळीक परब) : मराठा समाजाला ओबीसीमध्ये स्वतंत्र प्रगातून आरक्षण मिळावे. सरसकट कुणबी आरक्षण मागणीशी सामान्य मराठा समाजाचा संबंध नाही, अशी मागणी मराठा सकल समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

मराठा सकल समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक लेखी निवेदन दिले असून त्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी सुमारे ४० ते ५० वर्ष मराठा समाज करत आहे. त्यासाठी मराठा समाजाने अनेक आंदोलने आणि बलिदाने दिली आहेत. त्यांनी मूक मोर्चे ही काढले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांची ठाण्यात सभा

मनोज जरांगे पाटील यांचा दुसरा महाराष्ट्र दौरा सुरू असून मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी ते ठाण्यात जाहीर सभा घेणार आहेत. त्यावेळी ते मराठा सकल समाजाच्या मागणी संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे मराठ्यांचे लक्ष लागले आहे. ते त्यावेळी काय मराठ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. हे ऐकण्यासाठी ही सर्व उत्सुक आहेत. 

मनोज जरांगे पाटील यांच्या ठाण्यातील सभेला मराठा समाज एकवटणार

जरांगे पाटलांच्या सभेची तयारी मराठा समाजाने कधीच सुरु केली आहे. ठाण्यापासून ते अगदी कर्जत, कसारापर्यंतच मराठे या सभेला हजेरी लावण्याची शक्यता आहे. या सभेत मनोज जरांगे आपल्या मराठा बांधवांना संबोधणार आहेत. जिथे जिथे मराठा समाज वस्तीने राहत असतील तिथून ते सभेला हजर रहाणार आहेत.

आरक्षणाची चळवळ भरकटवण्याचा डाव

सर सकटपणे मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची मागणी म्हणजे मराठा समाजाची इतक्या वर्षाची चाललेली आरक्षणाची चळवळ काबीज करण्याचा डाव आहे. मराठा आरक्षणाची चळवळ भरकटवण्यासाठी ही मागणी पुढे केली गेली असावी असा संशय आहे. मराठा सरसकट कुणबीकरण करण्याच्या या मागणीत मराठी स्वाभिमानी व जात कागदोपत्री संपुष्टात आणण्याचा डाव तर नाही ना असाही संशय आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून हिंदू- मराठा म्हणून आरक्षण मिळावे अशी मागणी या निवेदनात केली आहे.

मराठा समाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न

आरक्षणासाठी मराठा नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या सोबतच अनेक मराठी बांधवांनी अनेकवेळा बलिदाने दिली आहेत. आतापर्यंतच्या मराठा समाजाच्या या चळवळीत मराठा समाजाने  कधीही सरसकट कुणबी आरक्षण मिळावे अशी मागणी केलेली नाही. ही हल्ली हल्लीच आणि संघटनांकडून होत आहे. त्यासाठी विविध मार्गाने सरकारवर आणि समाजावर दबाव टाकण्याच प्रयत्न देखील सुरू आहे. मात्र या मागणीला सर्वसामान्य मराठा समाजाचा पाठिंबा नाही. हा मराठा समाजाच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे, असे त्या निवेदनात नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post