दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदानिमित्त बैलांची ढोल ताशाच्या गाजर मिरवणूक

डोंबिवली ( शंकर जाधव ):  बलिप्रतिपदा, दिवाळी पाडव्याला शिळ गावातील सर्व ग्रामस्थांचे बैल एका ठिकाणी एकत्र येत गावामध्ये मिरवणूक काढण्याची पूर्वीपार परंपरा कायम राखली. सकाळी ५ वाजल्यापासून बैलांना सजवण्यासाठी तयारी सुरू झाली.

 बैलांना सजवून सकाळी ११ वाजता ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत फटाके वाजवून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत गावचे पोलीस पाटील संतोष भोईर, नागरिक व गोठे धारक शर्यतीचे बैलांचे मालक सखाराम आलिमकर, पंडित भोईर, नितेश आलिमकर, महेश भोईर, अनिल भोईर, महेश काठे, शरद आलिमकर, महेश आलिमकर, अजय भोईर, राजेश काठे, साईनाथ आलिमकर, साईनाथ भोईर, तुषार भोईर, आदि सहभागी झाले होते. बैलांच्या पाठीवर बैलांची नावेही टाकण्यात आली होती. यामाहा, बंदुक, लक्ष्या, अंजीर वजीर, बाजी, श्री, राणा, नाग्या, सुंदर, सरकार, खजूर, शंभू, महाकाल, अशी बैलांची नावे होती. 

दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे शासनाने सर्व सण व सांस्कृतिक कार्यक्रमात निबंध घातले होते. मात्र आता कोणतेही निर्बंध नसल्याने बैलांची मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडली. बैलांच्या पाठीवर आकर्षक सजावट करून त्यांच्या पाठीवर जय श्रीराम, काळुबाई प्रसन्न, महाकालेश्वर प्रसन्न, जय हनुमान, काहींनी सामाजिक संदेश लिहिण्यात आले होते बैलांच्या पाठीवर काढलेले देवदेवतांचे चित्र रेखाटण्यात आले होते. 

 बैलांच्या मालकांच्या पत्नीने बैलांला हळदी कुंकवाचा टीका लावून बैलांची आरती करून बैलांना गोड नैवेद्य खायला दिले. हनुमान मंदिर येथे मिरवणूक आल्यानंतर बैलांना देवाच्या दर्शनासाठी आणल्याने हनुमान परिसरामध्ये गर्दी झाली होती.



Post a Comment

Previous Post Next Post