अंबरनाथ व उल्हासनगरच्या कांही भागांचा वीजपुरवठा शुक्रवारी बाधित

डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-बदलापूर राज्यमार्गाजवळ महात्मा गांधी विद्यालयाचे प्रांगण तसेच संरक्षण भिंतीलगत रस्त्याच्या कडेला साधारणतः ३५-४० वर्षे जुनी २५ मीटर उंच मनोऱ्यावर डमी अतिउच्चदाब वाहिनी आहे. या वाहिनीतून कसल्याही प्रकारचा विद्युत पुरवठा होत नाही. सदर मनोरे व वाहिनी ही फार जुनी असल्याने धोकादायक बनली आहे. तसेच सदर वाहिनीच्या जवळ मध्य रेल्वेची ठाकुर्ली ते लोणावळा ही अति उच्चदाब वाहिनी या वाहिनीखालून जाते. त्यामुळे शुक्रवारी (२३ नोव्हेंबर) ही वाहीनी हटवण्यात येणार असून काही कालावधीसाठी अंबरनाथ व उल्हासनगरच्या कांही भागाचा वीजपुरवठा बाधित होणार आहे.

जुनी बंद असलेली विद्युत वाहिनी मनोऱ्यासह काढण्याचे काम मध्य रेल्वे व महावितरणद्वारे महात्मा गांधी विद्यालय यांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या कामाकरिता महावितरण तसेच मध्ये रेल्वेच्या अतिसंवेदनशील भागाचा विद्युत पुरवठा कमीत कमी कालावधीकरिता बंद करून काम करण्यात येणार आहे. 

या कामादरम्यान पुढील भागांचा वीजपुरवठा दुपारी १२ ते ४ दरम्यान बांधित होणार आहे. महाराष्ट्र हौसींग बोर्ड, डिफेन्स कॉलनी, कमलाकर नगर, वांद्रापाडा, नेताजी मार्केट, चिंचपाडा, गांवदेवी, अंबरनाथ केमिकल झोन अंबरनाथ (प), साई सेक्शन, शिव मंदिर रोड, कानसई सेक्शन, भिमनगर, शिवाजी चौक, हुतात्मा चौक, फुले नगर, जावसई, फॉरेस्ट नाका, वडळगाव एम आय डी. सी विभाग, सुभाश टेकडी, लालचक्की मराठा सेक्शन, उल्हासनगर स्टेशन परीसर, ओ.टी सेक्शन, अंबरनाथ (पुर्व), चिंचपाडा, वंदना थेटर, एम.जे.पी पाणीपुरवठा, अंबरनाथ स्टेशन रोड, भाजी मार्केट, मातोश्री नगर, जुने म्युनीसीपल कौन्सिल आणि १ नं. एच. टी. ग्राहक, स्वामीनगर, आय. टी. आय, उल्हासनगर ४ व इतर २२/२२ केव्ही अंबरनाथ स्विचिंग स्टेशन येथुन पुरवठा होणारा विभाग, उल्हासनगर विभाग २ व ३ मधील काही भागाचा समावेश आहे.



Post a Comment

Previous Post Next Post