मॉडेल इंग्लिश स्कूलचे लोकार्पण

 

आय आरबी इन्फ्राचे अध्यक्ष विरेन्द्र म्हैसकर यांची उपस्थिती

डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पूर्वेकडील मॉडेल इंग्लिश स्कूलच्या इमारतीचे नूतनीकरण करत अद्ययावत इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पण मॉडेल इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी आणि आयआरबी इन्फ्रा स्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेडचे अध्यक्ष विरेन्द्र म्हैसकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी केरळी समाजाचे अध्यक्ष वर्गीस डॅनियल, प्रेसिडेंट राधाकृष्णन नायर, जनरल सेक्रेटरी राजेश शेखरन नायर, एगुकेश सेक्रेटरी वेगुगोपाल कुडेट, बोनोय थोमास आदी मान्यवर उपस्थित होते.  

   मॉडेल इंग्लिश स्कूलचे इमारतीचे लोकार्पणानंतर केडीएमसी मैदानावर सांस्कृतिक मेळावा आणि मेगा स्टेज शो पार पडला. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत केरळी समाजाचे अध्यक्ष वर्गीस डॅनियल म्हणाले, डोंबिवलीतील पहिला शाळा असलेल्या डोंबिवली पूर्वेकडील पांडुरंगवाडी येथे मॉडेल स्कूल इमारती उभारण्यास नोव्हेंबर १९७२ साली सुरुवात करत जानेवारी १९८३ पासून या शाळेला सुरुवात झाली होती. ३५ वर्षांपासून या शाळेची इमारत पूर्णपणे मोडकळीस आल्याने २०२० मध्ये ही इमारत पाडून त्याजागी नव्याने अद्ययावत इमारत उभारण्यात आली या शाळेच्या निमित्ताने शाळेची स्वप्ने प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद डोंबिवलीतील केरळ समुदायाकडून व्यक्त केला जात आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या ७ मजल्याच्या शाळेत ३६ वर्गखोल्या, २ वाचनालय, प्रयोगशाळा, अत्याधुनिक सुविधांसह संगणक वर्ग आहेत. एक सभागृह आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या शिक्षण सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहे.

   तर आय आरबी इन्फ्रा चे अध्यक्ष विरेन्द्र म्हैसकर म्हणाले, शिक्षणावर कोरोना काळात सरकारने दिलेले योगदान आणि लक्ष याचे कौतुक आहे.भारता सारखी मोठ्या लोकसंख्येच्या देशात शिक्षण क्षेत्रात उंच भरारी मारली आहे.दरम्यान सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, प्रसिद्ध पार्श्वगायिका रंजिनी जोस आणि गायक ऋतुराज (रिजुतन) आणि विनोदी कलाकार विठुरा थंगाचन आणि अखिल कवडीयुर यांच्या समूहाचा मेगा स्टेज शो पार पडला.



Post a Comment

Previous Post Next Post