कल्याणमधील रुग्णालयातील अतिदक्षता विभागात शिरला साप

 कल्याण (शंकर जाधव ): कल्याणमध्ये वन्यजीवांच्या मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना हल्ली फार वाढत आहेत. त्यात अजून एक मोठी भर पडली ती म्हणजे, चक्क रुग्णालयातील अतिदशता विभागात साप आढळून आला.

पौर्णिमा टॉकीज जवळ असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या I.C.U. मध्ये साप शिरला, हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्याला ऑक्सिजन सिलिंडर येथे साप दिसला तेव्हा त्याने भयभीत होऊन इतर कर्मचाऱ्यांना सावध केले व त्वरित वॉर फाऊंडेशनच्या मदत क्रमांकावर संपर्क साधला तेव्हा प्राणी मित्र प्रेम आहेर व अक्षय वेखंडे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन कोणत्याही रुग्णाला इजा न पोहचू देता सापाचा सुखरूप बचाव केला.

         पकडलेला साप हा धामण जातीचा बिनविषारी सर्प असून त्या पासून मानवाला कोणत्याही प्रकारची हानी नाही व तो साप भक्षाच्या शोधात तिकडे आला असावा तसेच सर्प लवकरच वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली निसर्गमुक्त करण्यात येईल अशी माहिती प्राणीमित्र प्रेम आहेर यांनी दिली.





Post a Comment

Previous Post Next Post