प्रत्येकाला आरक्षणाची गरज वाटते, हे किती दुःखद

 


  सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे प्रतिपादन 

डोंबिवली : भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि आदिवासींना आरक्षण दिले, त्यांनी ते १० वर्षासाठी असेल असे संविधानात नमूद केले आहे. त्यानंतर आरक्षण राहू नये आशा प्रकारच्या धोरणांची आणि कायद्यांची गरज आहे, आज नेमकं उलट होतंय, शेतकरी विरोधी कायदे थोपवले जात आहेत, तर श्रमिकांच्या बाजूचे ४४ राष्ट्रीय कायद्यांपैकी २९ कायदे मागे घेऊन ४ कमजोर कायदे आणू पाहतात, याने प्रत्येकालाच आरक्षणाची गरज वाटते हे किती दुःखद  आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर दिले.

कल्याण मध्ये मेधा पाटकर यांनी कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त इंदूरणी जाखड यांची भेट घेऊन कामगारांचे प्रश्न मांडले. त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आरक्षणाबाबत बोलल्या.





Post a Comment

Previous Post Next Post