कल्याण ग्रामीण मनसे आमदार राजू पाटील यांचे ग्रामस्थांनी मानले आभार
दिवा, (आरती मुळीक परब) : कल्याण ग्रामीण मनसे आमदार राजू पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने राज्यातील अल्पसंख्याक बहुल नगरी क्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत प्रभाग क्रमांक ३३ शिळ ठाकूर पाडा, शिळफाटा महापे मार्गावर असलेल्या फॉन्टन हॉटेलच्या बाजूला आज विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
रातोरा मार्केट, आरमार हॉस्पिटल रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुनीर कंपाऊंडन पर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी २५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी एकूण ७५ लाखांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मनसे आमदार राजू पाटील यांचे आभार मानले आहेत.
भूमिपूजन सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती. या विकास भूमिपूजन सोहळा मध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, दिवा बेडेकर नगर विभाग अध्यक्ष मोतीराम दळवी, शिळ- देसाई विभाग अध्यक्ष शरद पाटील, संतोष पाटील, नितिकेश पाटील, मधुकर रोज, प्रविण बोह्राडे, मनोज पावसे, निलेश पाटील, महफुज मामा, समाजसेवक गणेश मुंडे, समाजसेवक राम माळी, समाजसेवक विनोद वास्कर, अमर भोईर, प्रेमनाथ आलिमकर, किसन जाधव, अतुल गुप्ता, प्रशांत जाधव आदी शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र