डोंबिवली ( शंकर जाधव ) : दिवाळी सण म्हंटल की सर्वत्र रोषणाई, दिवे,फटाके, नवीन कपडे, दिवाळी फराळ दिसतात. मात्र गतिमंद, स्वमग या मुलांची दिवाळी कशी असेल , ते स्वतः दिवाळीला लागणारी साहित्य बनवितात का ? असा प्रश्न सर्वांना पडतो.तर याचे उत्तर मिळेल श्री समर्थ कृपा स्कुल फॉर द स्पेशल निड चिल्डन शाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी सणासाठी बनविल्या वस्तूंच्या प्रदर्शनात. डोंबिवली पूर्वेकडील पी पी चेंबर समोर भरविले हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
ही समग्न मुले स्वतः या वस्तू नागरिकांना दाखविण्यासाठी उपस्थित आहेत. शनिवारी भरविलेलेली प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनविल्या दिवाळीतील साधे दिवे, फॅन्सी दिवे, अगरबत्ती,टोपल्या आदी वस्तु आहेत.यावेळी शाळेचे सर्व्हेसर्वा विनोद सूर्यराव यासह सहा शिक्षकही उपस्थित होते.या मुलांची दिवाळी आपल्यासारखी सुखाची आणि आनंदाची जावी याकरिता या प्रदर्शनाला भेट द्या अशी विंनती सूर्यराव यांनी केले आहे.