दिवा (आरती मुळीक परब) : शिवसेना उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या कार्यालयात दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भाऊबीज कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दिवा शहरातील शेकडो महिलांनी शैलेश पाटील यांना भाऊबीज निमित्त ओवाळणी केली.
दरवर्षी पाटील यांच्या कार्यालयात रक्षाबंधन आणि भाऊबीज कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतो. यावेळी शैलेश पाटील यांना भाऊ मानणाऱ्या शेकडो महिला ओवाळणी करण्यासाठी पाटील यांच्या कार्यालयात येत असतात. यावर्षी भाऊबीज कार्यक्रम भाऊबिजेनंतर पाटील यांच्या कार्यालयात पार पडला. यावेळी पाटील यांच्याकडून महिलांना साडी भाऊबीज भेट म्हणून देण्यात आली.
Tags
महाराष्ट्र

