डोंबिवली ( शंकर जाधव ) : काही दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील कर्णिक रोड परिसरात नाशिक यशवंत राव चव्हाण विद्यापीठाचे माजी कुलगुरु व छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ अशोक प्रधान यांच्या राहत्या घरी पाच आरोपीने शिरूर यांना बेदम मारहाण करत त्यांच्या वस्तू चोरून २० लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा कल्याण महात्मा फुले पोलिसांकात दाखल झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी तपास करत पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत या गुन्ह्यात फरार असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. संजय भागवंत जाधव , संदेश जाधव असे या दोन्ही आरोपीचे नाव असून यात संजय जाधव हा शिक्षक असून २०१७ ला त्याला शिक्षक पदावरून कारवाई करत निलंबित करण्यात आले होते.
पण निलंबनानंतर त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून वेळेवर हप्ते भरले नाही म्हणून त्याचं घरी जप्तीला निघाल्याने त्याने आपल्या मित्रासह माजी कुलगुरूच्या घरी जाऊन मला पुन्हा कामावर घ्या अन्यथा हप्ते भरण्यासाठी वीस लाख रुपये द्या असे सांगत त्यांना घरात कोंडून मारहाण करत त्यांच्या वस्तू घेऊन फरार झाला होता. मात्र गुन्हा दाखल होताच कल्याण महात्मा फुले पोलिसांनी तात्काळ या शिक्षकांचा शोध घेत त्याला व त्याच्या एका सहकार्याला अटक केली असून त्याच्यासोबत असलेल्या अन्य तीन जणांचा शोध सुरू केला आहे.
