प्रेक्षकही आमच्यावर, आमच्या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करतील - अभिरा उर्फ समृद्धी शुक्ला

 


‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका ‘स्टार प्लस’ वर रात्रौ ९.३० वाजता प्रसारित होईल.

“या मालिकेचा दर्जा जपण्यासाठी सर्वांनी रक्त आणि घाम आटवले आहे, म्हणूनच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. आम्ही सर्वांनी या मालिकेसाठी आमचे सर्वोत्तम योगदान दिले आहे, आणि आम्हांला आशा आहे की, प्रेक्षकही आमच्यावर आणि आमच्या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करतील”, अशा शब्दांत ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी समृद्धी शुक्ला उर्फ अभिरा हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. ही मालिका आजपासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर रात्रौ ९.३० वाजता प्रसारित होणार आहे.

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या आजपासून सुरू होणाऱ्या नव्या पर्वात, समृद्धी शुक्ला आणि शहजादा धामी हे कलावंत मुख्य भूमिका साकारत मालिकेचा समृद्ध वारसा पुढे नेणार आहेत. समृद्धी शुक्ला (अभिरा), शहजादा धामी (अरमान), प्रतीक्षा होनमुखे (रूही) आणि शिवम खजुरिया (रोहित) यांचा परिचय करून देणार्‍या या मालिकेची एक चित्तवेधक झलक प्रेक्षकांना अलीकडेच पाहायला मिळाली. या ‘प्रोमो’त मालिकेच्या कथानकाने एक अनपेक्षित वळण घेतल्याचे पाहायला मिळाले होते, ज्यात एका क्लेशकारक घटनेमुळे अभिरा आणि अरमान लग्नाची गाठ बांधतात खरे, पण तरीही अरमान मात्र आजही रुहीच्या प्रेमात आहे, जिचे अरमानच्या भावाशी- रोहितशी लग्न होते. मालिकेच्या नव्या अध्यायात अभिरा, अरमान, रूही आणि रोहित यांच्या आयुष्यात उलगडत जाणारे रंजक नाट्य प्रेक्षकांना गुंतवून ठेवेल.

आजपासून सुरू होणाऱ्या ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेच्या नव्या पर्वात मुख्य भूमिका निभावणारी समृद्धी शुक्ला उर्फ अभिरा हिच्या बोलण्यातून मालिकेसंदर्भातील तिची उत्कंठा व्यक्त होत होती. ती म्हणाली, “ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेबाबत एकाच वेळी मला खूप कुतूहलही वाटतंय आणि मी अस्वस्थही आहे; परीक्षेच्या निकालाची वाट पाहताना जसे होते, तशी माझी अवस्था आहे. आम्हां सर्वांना आशा आहे की, आम्ही जे काही प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत, ते पाहून आमच्या वाट्यालाही प्रेक्षकांचे प्रेम आणि कौतुक येईल. अभिरा तिच्या आईबद्दल ‘पझेसिव्ह’ आहे, तिची आई म्हणजे तिचे जग आहे, परंतु त्याच वेळी, अक्षरा ही अभिराची ताकद आहे. जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करता, तेव्हा ती व्यक्ती तुमची सर्वात मोठी शक्ती बनते आणि तितकाच तुमचा कमकुवतपणाही असते. याचेच दर्शन मालिकेच्या नव्या पर्वातील प्रत्येक भागात प्रेक्षकांना घडेल. अभिरा खूप आततायी आणि अव्यवस्थित आहे, पण तरीही तुम्ही तिच्या प्रेमात पडाल, अशी आहे! ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेचा एक भाग बनले, यांत मी धन्यता मानते. सर्वांनीच रक्त आणि घाम आटवून काम केले आहे, म्हणूनच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. आम्ही सर्वांनी या मालिकेसाठी आमचे सर्वोत्तम योगदान दिले आहे, आणि आम्हांला आशा आहे की, प्रेक्षकही आमच्यावर आणि आमच्या मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करतील.”

या मालिकेच्या नव्या पर्वाच्या... या नव्या प्रवासाचे साक्षीदार व्हा- आज ६ नोव्हेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री साडे नऊ वाजता स्टार प्लसवर! ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेचे निर्माते राजन शाही आहेत.



Post a Comment

Previous Post Next Post