डोंबिवली ( शंकर जाधव ) माजी नगरसेवक राजेश मोरे व माजी नगरसेविका भारती मोरे यांच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही दत्तनगर आणि संगीतानगर, संगीतवाडी, आयरेविभाग, रघुवीरनगर प्रभागात नागरिकांना दिपावलीच्या शुभेच्छा देत फराळ किट भेट म्हणून देण्यात आली. साडे पाच सहा किलो फराळ किटमध्ये दिवाळी फराळ साहित्य, उटणे, रांगोळी, कंदील आणि भेटवस्तू असे हे किट १० हजार नागरिकांना वाटप करण्यात आले. दिवाळी भेट किट वाटपाचा कार्यक्रम मातोश्री सुभद्रा काशिनाथबुवा पाटील सभागृह, श्रीदुर्गामाता मंदिर, टंडन रोड, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला होता.माजी नगरसेवक तथा डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख मोरे यांनी प्रभागातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत किटचे वाटप केले. यावेळी पदाधिकारी गजानन व्यापारी, अमित सावंत ,कैलास आदी उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र

