वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम
डोंबिवली ( शंकर जाधव ) : दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा’, ‘फोर व्हिलर चालवताना सीटबेल्ट वापरा’ अशा सूचना वाहतूक पोलिसांकडून दिल्या जातात.मात्र वाहतूक पोलिसांचे नियम धाब्यावर ठेवून आपला जीव धोक्यात टाकत वाहनचालक हेल्मेटचा वापर करत नाही.
यावर कल्याण पश्चिमेला वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली. या वाहनचालकांना सूचना देण्यासाठी कल्याण वाहतूक पोलिसांनी चक्क यमराजाच्या वेषात वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना गुलाब पुष्प देऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला.
Tags
महाराष्ट्र
