- बेलापूर ते पेंधरचा हा मार्ग ११ किमींचा प्रवास
- १० ते ४० रुपयांपर्यंतचे तिकीट
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सिडकोला आदेश
नवी मुंबई: मागील १४ वर्षांपासून नवी मुंबईकर या मेट्रोच्या प्रतीक्षेत होते. मेट्रोचे काम पूर्ण झाले तरी लोकार्पणच्या प्रक्रियेत नवी मुंबईच्या मेट्रो सुरू होणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेलापूर ते पेंधर असा पहिला टप्पा आजपासून सुरू करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात नवी मुंबईत मेट्रो धावणार आहे. बेलापूर ते पेंधरचा हा मार्ग ११ किमींचा असून बेलापूर ते पेंधर मार्गावर ११ स्थानके आहेत.
अनेक वर्षांपासून नवी मुंबईचे नागरिक या मेट्रो सेवेचा शुभारंभ होण्याच्या प्रतीक्षेत होते. नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेणधर या मार्ग क्र. १ वर शुक्रवारी म्हणजेच १७ नोव्हेंबरपासून औपचोरिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मेट्रोद्वारे नवी मुंबई अंतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामध्ये मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे मेट्रोच्या अंमलबजाणीचे काम प्रभावीपणे सुरू आहे. सदर मार्ग क्र. १ वर दर १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.
नवी मुंबईच्या मेट्रोची ११ स्थानक आहेत, प्रत्येक १५ मिनीटांनी एक मेट्रो धावणार आहे. एका मेट्रो मधून १ हजार १०० नागरिक प्रवास करू शकतात. नवी मुंबई करांना गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे.
तिकीट दर
बेलापूर ते पेंधरचा हा मार्ग ११ किमींचा आहे. शेवटची फेरी रात्री १० वाजता असणार आहे. पेंधर ते बेलापूर या स्थानकांदरम्यान सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो धावणार आहे तर दोन्ही बाजूंची पहिली मेट्रो फेरी रात्री १० वाजता असणार आहे. मार्ग क्रमांक १ वर दर पंधरा मिनिटांनी एक मेट्रो धावणार आहे. मेट्रोचे तिकीट दर हे ० ते २ किमीच्या टप्प्यासाठी १० रुपये २ ते ४ किमी टप्प्या करता १५ रुपये, ४ ते ६ किमींसाठी २० रुपेय ६ ते ८ किमींसाठी २५ रुपये, ८ ते १० किमीसाठी ३० रुपये आणि त्यापुढील टप्प्यासाठी ४० रुपये असे तिकीट दर असणार आहेत.
मेट्रोची स्थानके
नवी मुंबईच्या या मेट्रो १ मार्गिकेमध्ये ११ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सीबीडी-बेलापूर, सेक्टर ७, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर ११, खारघर, सेक्टर १४, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर ३४, पाचनंद आणि पेंधर-तळोजा अशी स्थानके आहेत.
.jpeg)
.jpeg)