कोणालाही न दुखवता मराठ्यांना आरक्षण द्यावे

 


  माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे मत

डोंबिवली ( शंकर जाधव ):  मुख्यमंत्री आणि सरकार सांगतंय की कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आरक्षण देऊ. जर या पद्धतीने मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल शंभर टक्के दिले तरी चालेल. पण ज्याच्या त्याच्या जीववार येणार tअसेल तर प्रत्येकाला हातपाय हलवावे लागणारच. पण आम्हाला असं वाटत कि कोणालाही न दुखावता मराठ्यांना आरक्षण द्यावं. तसंच गावाबंदी न करता लोकशाहीत सर्वांचा आदर ठेवला पाहिजे असे मत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी डोंबिवलीत पत्रकरांशी बोलताना व्यक्त केले.

    पूर्वेकडील महापालिकेच्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे सुरू झालेल्या १९ वा आगरी युथ फोरमच्या आगरी महोत्सवाचे उदघाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती अध्यक्ष दशरथ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, विश्वनाथ रसाळ, जालिंदर पाटील, रामकृष्ण पाटील, प्रकाश भंडारी, पांडुरंग म्हात्रे, गंगाराम शेलार , सुरेश पाटील, वसंत पाटील, आगरी कोळी मेडिको असोसिएशचे अध्यक्ष डॉ.दिनेश म्हात्रे, संगीता पाटील, नवनीत पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.ठाकूर यांना पत्रकारांनी मराठा आरक्षण संदर्भात विचारले असता ते म्हणाले,ओबीसी आरक्षणावर कोणीही गदा आणण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी समाज स्वस्थ बसणार नाही. आमच्या ओबीसी आरक्षणाला हात लागता कामा नये असं येथे उपस्थित असलेल्या ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे. 





     

Post a Comment

Previous Post Next Post