डोंबिवली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समिती अध्यक्ष दशरथ पाटील म्हणाले, आम्ही आगरी कोळी ओबीसी म्हणून आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, मराठा समाजातही आज गरिबी आहे. मराठा आमचा दुश्मन नाही, मैत्री संवादचे संबंध आहेत पण जर का कोणी सांगत असेल की यांना असं करू, असं कोणी म्हणू नये, ज्याप्रमाणे आमदारांची घर जाळाली, मंत्र्यांच्या गाड्या फोडल्या जातात हे ठीक नाही. यशवंतराव चव्हाण यांचाही अशा गोष्टीला विरोध होता. त्यांनीही तेव्हा म्हटलं होतं कि असं करणाऱ्यांवर कडक करावाई करेन, मग आता तस होतंय का, आम्ही असं ठामपणे सांगू की आमच्या ओबीसी मधून झालं तर धडक कारवाई करावी, जर महाराष्ट्र सुजलम सुफलम करायचं असेल तर सर्वांनी एकोप्यानी राहण्याची गरज आहे.
प्रस्तावानेत गुलाब वझे यांनी १९ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सव माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांची आणि संस्थेच्या उद्देशाची माहिती सर्वांसमोर ठेवली. यामध्ये शालेय सांस्कृतिक कार्यक्रम, महिला हरिपाठ, प्रकट मुलाखत, व्याख्यान, विनोदी कार्यक्रम, परिसंवाद, आगरी कवी संमेलन, मराठी भाषा संवर्धन व जतन तसेच कला, नृत्य, खास आगरी खाद्यपदार्थ त्याचबरोबर खरेदी हे महोत्सवाची वैशिष्ट्य आहे असे सांगितले. यावेळी आगरी महोत्सवाच्या आठवणी सांगणाऱ्या कणसा स्मरणिका प्रकाशन करण्यात आले. दरम्यान गेली २० वर्ष अमेरिकेतील प्रख्यात उद्योजक आणि मुळच्या डोंबिवलीकर डॉ. संगीता पाटील म्हणाल्या, मी २० वर्षापासून अमेरिकेत राहत असून भारत देशातील एनर्जी मला माझ्या कामात प्रोत्साहन देते. समाजातील तरुण पिढीने उंच भरारी घ्या, जग जिंका, पण आपल्या भूमिला विसरू नका, तरुण पिढीनी शिकत रहा असा यशस्वी होण्याचा मंत्र दिला. सूत्रसंचालनाची जबाबदारी शरद पाटील यांनी सांभाळली.
.jpeg)