पत्नी मुलाची हत्या करणाऱ्या पतीला संभाजीनगर मधून अटक

डोंबिवली ( शंकर जाधव ) : व्यावसायिक दीपक गायकवाड शुक्रवारी पत्नी अश्विनी व आदिराजची हत्या करून पसार झाला होता. दीपकला पोलिसांनी संभाजीनगरमधून अटक करून गजाआड केले. हत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी पुढील पोलीस तपासात ते उघड होईल. आई मुलाचा जन्मदिवस आणि शेवटचा दिवस एकच ठरला. 

मिळालेल्या माहितीनुसार, दीपकचे कल्याणला खेळण्याचे दुकान असून त्याच्याकडे काम करणाऱ्या अनेक कामगारांचे पगार थकले होते. तर कल्याण शहरात मध्यवर्ती भागात निधी रिसर्च फर्म फायनाशियल कन्सल्टट कंपनीत गुंतवणूकदारांना ६ ते ८ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत करोडो रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती. सुरुवातीला गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणाऱ्या दीपकचा व्यवसाय बुडीत निघाला होता. आपले गुंतविले पैसे परत मिळावे याकरता गुंतवणूकदार त्याच्याकडे तगादा लावत होते. 

दीपकने पत्नी व मुलाचे जीवन संपविण्याचा निर्णय घेत शुक्रवारी त्यांच्या जेवणात जेवणात विष घातले. यात आदिराजचा जीव गेला मात्र पत्नी अत्यवस्थ झाल्याने दीपक याने उशीने तिचे तोंड दाबून तिची हत्या केली. त्यानंतर दीपकने पंख्याला साडी बांधून गळफास लावून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला मात्र घाबरून त्याने तिथून पळ काढला. आपण पकडले जाऊ या भीतीने दीपक संभाजीनगरला जात असताना त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवरून त्याचा पाठलाग करत पोलिसांनी पकडले.



Post a Comment

Previous Post Next Post