अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी जगन्नाथ आप्पा शिंदे

२०२३ ते २०२६  तीन वर्षासाठी सहाव्यांदा निवड 

डोंबिवली ( शंकर जाधव ) : इंदोर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये जगन्नाथ आप्पा शिंदे यांची अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्षपदी सन २०२३ ते २०२६ या तीन वर्षाच्या कालावधीसाठी पुन्हा एकदा सहाव्यांदा निवड झाली. तर सरचिटणीस पदी मध्य प्रदेशचे राजीव सिंघल आणि खजिनदारपदी गुजरातचे जसुभाई पटेल यांची एकमताने निवड झाली.

इंदोर च्या ब्रिलीएंट कन्वेंशन सेंटर, येथे सुमारे दीड ते दोन हजार केमिस्ट बांधवांच्या उपस्थितीत या निवडीची घोषणा करण्यात आली. सर्व केमिस्टांनी जगन्नाथ आप्पा शिंदे व सर्व नव निर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.



Post a Comment

Previous Post Next Post