श्रेयसच्या प्रकृती अस्वस्थतेनंतर अजिंक्य राऊतची आगपाखड
मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला दोन दिवसांपूर्व हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी आल्याने सगळीकडे चित्रपट क्षेत्रातील लाइफ स्टाईलच्या चर्चेला उधाण आले. त्यात अजिंक्य राऊतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कलाकारांच्या कामाविषयी वक्तव्य करत आपण मनोरंजन क्षेत्रात आहोत, त्यामुळे आपलं पण मनोरंजन होतंच असं नाही. जसे परदेशात कामाचे तास ठरवून दिले आहेत, त्याचे नियम आहेत, तसेच आपल्याकडे पण हवेत. १२ तासाचे १४ तास होतात... जास्त वेळ काम केले तर त्याचे पैसे मिळतात. पण, आपल्याकडे कलाकार आणि टेक्निकल टीममध्ये पण बेभानपणा जाणवतो. अभिनय हे उत्कंटतेनं करण्याचेच काम आहे. पण, तिथे कुठेतरी बांध असावा असे मला वाटतं. कारण शेवटी आपणही माणूसच असल्याची भावना व्यक्त केली.
लोकप्रिय मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे हा फक्त मराठी नाही तर बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय असतो. त्याचे लाखो चाहते आहेत. दोन दिवसांपूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात होते. इचकंच नाही तर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली होती. त्यादिवशी दिवसभर तो शूटिंग करत होता. 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर तो अचानक बेशुद्ध पडला. त्यानंतर त्वरीत त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. आता तो स्थिरावत असताना सगळीकडे असं कशामुळे झालं याविषयी चर्चा सुरू आहे. त्यावरून आता लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्यानं वक्तव्य केलं आहे.
'मन उडू उडू झालं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कलाकारांच्या कामाविषयी वक्तव्य केलं आहे. अजिंक्यनं ही मुलाखत रेडिओ सिटीला दिली होती. या मुलाखतीत त्यानं खुलासा केला की श्रेयस दादासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थना करायला हवी. मी दादाला खूप मानतो. तो आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणा आहे. आपण मनोरंजन क्षेत्रात आहोत, त्यामुळे आपलं पण मनोरंजन होतंच असं नाही. जसे परदेशात कामाचे तास ठरवून दिले आहेत, त्याचे नियम आहेत, तसेच आपल्याकडे पण हवेत. १२ तासाचे १४ तास होतात... जास्त वेळ काम केले तर त्याचे पैसे मिळतात. पण, आपल्याकडे कलाकार आणि टेक्निकल टीममध्ये पण बेभानपणा जाणवतो. अभिनय हे उत्कंटतेनं करण्याचेच काम आहे. पण, तिथे कुठेतरी बांध असावा असं मला वाटतं. कारण शेवटी आपणही माणूसच आहोत.'.jpeg)
.jpeg)