२०२४ दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिवा, (आरती मुळीक परब) : श्री भागणे प्रतिष्ठान आयोजित प्रतिष्ठानचषक ओव्हर आर्म भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आणि २०२४ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळादिव्यातील भगवान पाटील क्रिडांगण, म्हातार्डी येथे मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. याप्रतिष्ठान चषक स्पर्धेचे चौथे वर्ष असून यात १६ संघानी भाग घेतला होता. प्रथमक्रमांक विजेत्या संघास रोख पंचवीस हजार रक्कम व भव्य असा चषक प्रथम करंजाळीतील श्रीशा इलेवन (११) यांनी पटकावला तर द्वितीय क्रमांकाचे रोख पंधरा हजार रुपये वचषक जय हनुमान (भोपण) संघाला देऊन सन्मानित करण्यात आले. तेव्हा भगवान पाटील आणि नवनीत पाटील या मान्यवरांच्या हस्ते २०२४ च्या दिनदर्शिकेचे उद्घाटन झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगवान पाटील, नवनीत पाटील, वैष्णव नवनीत पाटील (उबाठा गट, दिवा उपविभागप्रमुख योगिता नाईक, मनसे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील, मनसे उपाध्यक्ष मोतीराम दळवी उपस्थित होते. नंतर जयंत पाटील, समाजसेवक कुशन भोईर, विजय भोईर (भाजप ठाणे जिल्हा सरचिटणीस), मोहन तांडेल, यज्ञेश नरेश पवार, जगन्नाथ नाना पाटील, सोपान जाधव, राजेश पाटील- शिवसेना शाखाध्यक्ष दातीवली, कुणबी विकास संघ १८ गाव पदाधिकरी, संदीप मुंडे, हेमंत नाईक, उत्तम भोईर, काळू पाटील या मान्यवरांचा भागणे प्रतिष्ठान तर्फे स्वागत व सत्कार केला गेला.
या वरील दोन्ही कार्यक्रमांना महेश भागणे - मुख्य कार्यकारी प्रमुख,संतोष भागणे -अध्यक्ष, मनिष भागणे- सचिव, तानाजी भागणे- उपाध्यक्ष, राहुल मांजरेकर- सहसचिव, निलेश भागणे - सह खजिनदार, शैलेश भागणे-खजिनदार, गजानन भागणे- कार्याध्यक्ष, अशोक भागणे, मंगेश भागणे, सुधाकर भागणे, शांताराम भागणे, यशंवत भागणे, संदीप भागणे, लक्ष्मण मांजरेकर, मधुकर भागणे, भालचंद्र भागणे, प्रदीप मांडवकर आणि महिला वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.