बचत करण्यात महिला स्मार्ट

 

आजची नारी, जगात भारी असं उगाच म्हणत नाहीत. अगदी पुर्वीपासून काटकसर करून थोडे पैसे वाचवून ठेवून संसाराला हातभार लावणाऱ्या अनेक स्त्रियांची उदाहरणं आपल्याला माहित आहेत. हा गुण महिलांमध्ये मुळातच असतो. पण यामागचं नेमकं कारण काय, जाणून घेऊया

जेव्हा बचतीचा मुद्दा येतो तेव्हा काही सीमा बनवून नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. याबाबतीत महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक शिस्तप्रिय असल्याने त्यांना बचत करणं सहज शक्य होते.
  सामान्यतः पुरुषांच्या तुलनेत महिला कमी रिस्क घेतात. त्या सुरक्षित व्यवहार करण्यावर भर देतात. शिवाय बचतही सुरक्षित ठिकाणी करण्यावर त्यांचा भर असतो. मग कमी रिटर्न्स मिळाले तरी हरकत नाही असा दृष्टीकोन असतो.

१) उत्पन्नाचा स्रोत- आपण काम करीत असल्यास आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत समजून घ्या; तसेच आपल्या जोडीदाराच्याही उत्पन्नाचा स्रोत समजून घ्या. आपल्याकडे पगार किंवा व्यवसायाचे उत्पन्न, लाभांश, घरभाडे, मुदत ठेवीचे व्याज आदी कोणत्या मार्गाने पैसे येत आहेत, हे माहिती करून घ्यावे.

२) बचत- महिला सर्वसामान्यत: पैशाची बचत करतात. त्यामुळे ही बचत नेमकी कशी करावी याच्या काही खास टीप्स पाहुयात.

अ) बचत केव्हा कराल - महिन्याच्या सुरुवातीस, कारण खर्च करण्यापूर्वी बचत करणे नेहमीच चांगले असते.

ब) बचत कशी कराल - पैशांची बचत करण्यासाठी चैनीच्या वस्तू, हॉटेलिंग आदींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परंतु, याचा अर्थ गुणवत्तेशी तडजोड करणे असे नाही. चांगले अन्नधान्य, फळे, भाजीपाला यांच्या बाबतीत तडजोड करू नका.

क) कसे - जेथे तातडीने खर्च करणे आवश्यक नाही, तेथे खर्च पुढे ढकला. अनावश्यक खर्च टाळा. अर्थसंकल्पामुळे अधिक बचत होऊ शकते.

३) गुंतवणुकीची मूलतत्त्वे - गुंतवणुकीची मूलतत्त्वे माहिती असणे आवश्यक आहे. आपत्कालीन निधी, आरोग्य विमा आणि मुदत विमा काढणे गरजेचे असते.

४) गुंतवणूक - महिलांना मुदत ठेव, शेअर्स, म्युच्युअल फंड, गोल्ड ईटीएफ, पेन्शन योजना आदी वेगवेगळ्या पर्यायांबद्दल माहिती असली पाहिजे.

५) कर -आर्थिक नियोजनात कर हा एक महत्त्वाचा घटक आहे. उत्पन्न, गुंतवणूक, घर आदींशी संबंधित वेगवेगळ्या करांची माहिती महिलांनी जाणून घ्यावी. त्यामुळे योग्य निर्णय घेण्यास मदत होते.

हे सर्व अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि गुंतवणूक करण्यासाठी आपण अनुभवी आर्थिक सल्लागाराची मदत देखील घेऊ शकता.








Post a Comment

Previous Post Next Post