कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याणमधील सर्वोदय गार्डन येथे राहणारा कृष्णा अमित वायकर हा वाशी ब्रीज ते कुलाबा ३० किलोमीटर पोहून सरत्या वर्षाला निरोप देणार आहे.
ऑल सेंट्स हायस्कूलमध्ये ६ वीत शिकत असलेल्या कृष्णाला पोहण्याची आवड असल्याने त्याने डोंबिवलीतील यश जिमखाना येथे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. कृष्णा चार ते पाच महिन्यांपासून यश जिमखाना मध्ये येतोय. कृष्णा समुद्रातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी यश जिमखाना मध्ये दररोज सराव करतोय.
कृष्णाने ठरविले की अरबी समद्रात ३० डिसेंबर ला ३० किलोमीटर न थांबता सलग वाशी ब्रीज ते कुलाबा पोहून पार करायचे.त्यासाठी स्विमिंग प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली यश जिमखाना मध्ये दररोज सराव चालू आहे. यश जिमखाना मालक वडनेरकर व स्टाफ यांनी कृष्णाला हे ३० किलोमीटर सागरी जलतरण अंतर पोहून पार करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.