सणासुदीच्‍या काळात होम डेकोर उद्योगामधील विक्रीमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ

 


मुंबई,: सणासुदीच्‍या काळादरम्‍यान भारतातील होम डेकोर उद्योगामधील विक्रीमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसण्‍यात येते, विशेषत: वास्‍तविक साजरीकरणाला सुरूवात होण्‍याच्‍या चार ते पाच महिने अगोदरपासून विक्रीला सुरूवात होते. डॉर्बीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेहुल अग्रवाल म्हणाले जुलै ते जानेवारी या सणासुदीच्‍या काळादरम्‍यान विक्रीमध्‍ये वाढ होण्‍याला अनेक घटकांचे योगदान असते, जसे घरामध्‍ये व व्‍यावसायिक क्षेत्रांमध्‍ये सुशोभिकरण व रिनोवेशनवरील अधिक भर. सणासुदीच्‍या काळासाठी उत्‍साहपूर्ण व स्‍वागतार्ह वातावरण निर्माण करण्‍याच्‍या इच्‍छेमुळे व्‍यक्‍ती व व्‍यवसाय होम डेकोर उत्‍पादने व सेवांना अधिक प्राधान्‍य देतात, ज्‍यामुळे उद्योगासाठी विक्रीमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.

 अग्रवाल पुढे म्हणाले, मेट्रो शहरांमधील विक्रीमध्‍ये सतत वाढ होत असली तरी द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये आणि ग्रामीण भागांमध्‍ये देखील मागणीमध्‍ये वाढ होत आहे. द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील विक्रीमधील वाढीचे प्रमाण मेट्रो शहरांमधील १० टक्‍के ते १४ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत १५ टक्‍के ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. याचे श्रेय द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमध्‍ये झपाट्याने विकसित होत असलेल्‍या पायाभूत सुविधांना जाते, ज्‍यामुळे घराला सुशोभित करणारी उत्‍पादने व सेवांप्रती मागणी वाढत आहे.

भारतातील, विशेषत: द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधील होम डेकोर उद्योग प्रबळ वाढीसाठी सज्‍ज आहे. हा ट्रेण्‍ड आगामी वर्षांमध्‍ये देखील सुरू राहण्‍याची अपेक्षा आहे, तसेच या शहरांमधील अधिकाधिक व्‍यक्‍तींना त्‍यांचे लिव्हिंग स्‍पेसेस सुशोभित करण्‍यासाठी आर्थिक साधने मिळण्‍यासह आधुनिक उत्‍पादने/ट्रेण्‍ड्स उपलब्‍ध होतील.

फक्‍त सणासुदीच्‍या काळामध्‍येच लॅमिनेट्ससाठी ट्रेण्ड्स अधिक असतात असे नाही, तर त्‍यांचे सर्वोत्तम स्‍वरूप पाहता पेस्‍टल्‍स, आकर्षक रंग, सेल्‍फ-टेक्‍स्‍चर फिनिशेस्, स्‍टोन फिनिशेस् व फ्लूटेड पॅटर्न्‍सप्रती वाढती पसंती देखील आहे. या निवडींमधून कालातीत आकर्षकता दिसून येते, जी सीझनपलीकडे देखील कायम टिकून राहते.

अग्रवाल म्हणाले लॅमिनेट्स दुर्मिळ फर्निचर कव्‍हरिंग्‍जवरून बजेटबाबत जागरूक असलेल्‍या, तसेच अधिक खर्च करण्‍याची क्षमता असलेल्‍या ग्राहकांसाठी वैविध्‍यपूर्ण निवड बनले आहेत. तंत्रज्ञानामधील सुधारणांमुळे लॅमिनेट फिनिशला वास्‍तविक रूप मिळाले आहे, ज्‍यामुळे टिकाऊ, स्‍टायलिश, कमी-देखरेख

करण्‍याची गरज असलेल्‍या पर्यायांची व्‍यापक श्रेणी उपलब्‍ध आहे."

Post a Comment

Previous Post Next Post